न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

“जिवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा” – पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी

“जिवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा” - पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी

“घ्याल अंमली पदार्थाची साथ तर आयुष्य होईल बरबाद”

“जिवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा” – पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

दि.२६ जुन हा दिवस जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येतो. अंमली पदार्थामध्ये कोकेन, ब्श्राउन शुगर/हेरॉईन, चरस, एसएसडी, एमडीए, एसटीपी, मेफेड्रोन इत्यादी प्रमुख पदार्थाचा समावेश होतो.अंमली पदार्थाच्या उत्पादन, विक्री, वाहतुक,सेवन यावर नियत्रंण आणण्यासाठी केंद्र सरकारने १९८५ साली गुंगी कारक पदार्थ व मनो व्यापारावर परीनाम करणारे पदार्थ यांना प्रतिबंध करणारा कायदा अंमलात आणला. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यु, श्वसनाचा त्रास होणे, दात शिवशिवने,शरीर थरथर कापने इत्यादी गंभीर परीणाम माणसाचे शरीरावर होतात. कांही अंमली पदार्थाचे रुग्ण आत्महात्येलाही प्रवृत्त होतात. तरुणांनी कॉलेज जिवनाचा आनंद घेणे, थ्रिल अनुभवनेयासाठी अंमली पदार्थाच्या मार्गाचा अवलंब करु नये. अंमली पदार्थसेवनामुळे होणारे परीणाम हे सेवन करणाऱ्या व्यक्ती बरोबर त्यांचे कुटुंबाती प्रत्येक व्यक्तीला भोगावे लागतात. तरी तरुणांनी व नागरीकांनी अंमली पदार्थाच्या आहारी न जाता प्रत्येकाने चांगल्या सवई अंगी कराव्यात. कांही वेळा प्रभोलनामुळे तरुण पिढी अंमली पदार्थ घेण्याकडेही वळते, मात्र त्यामुळे तरुणांचे/ नागरीकांचे अयुष्य बरबाद होते, म्हणुन अशा धोकादायक अंमली पदार्थापासुन दुर राहवे, तरुणानी व्यायाम, क्रिडा क्षेत्र, वाचन यांची आवड बाळगावी. अंमली पदार्थाच्या विक्री बद्दल कोणतीही माहिती प्राप्त झाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावे. असे आहवान जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जनतेस केले आहे. 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे