शिवजयंती निमित्त तुळजापूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

शिवजयंती निमित्त तुळजापूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पोलिस ठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
१९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे.यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असताना शांता सुवेवस्थ दक्षता घावी तसेच रक्तदान शिबीर घ्या तसे मिरवणूक करण्याऐवजी पारंपारिक वाद्य कौतुकास्पद आहे व्यसन करणारे शिवाजी महाराजांचे मावळे होत नाही.असे प्रतिपादन पोलीस पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांनी पोलीस ठाण्यात तुळजापूर येथे शांतता कमिटीची बैठकीत दि.५ फेब्रुवारी रोजी बोलताना सांगीतले.
पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी व पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शना खाली बैठक संपन्न झाली.
यावेळी पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर, रवि भागवत, क्षिरसागरसह सह.पोलिस निरिक्षक भालेराव, आबासाहेब कापसे आदि व्यासपिठावर उपस्थित होते.मराठा ठोक क्रांती मोर्चा चे महाराष्ट्र राज्य समन्वयक आबासाहेब कापसे बोलताना म्हणाले की तुळजापूर शहरातील युवक शिवजयंती असो वा महापुरुषांची जयंती असो कोणताही उत्सव असो 90 टक्के व्यसनाच्या आहारी जात आहेत त्यांना कुठेतरी पायबंद घातला पाहिजे शांतता समितीची दि. ५ फेब्रुवारी रोजी बैठकीत कापसे यांनी बोलताना सांगितले.यावेळी माजी नगरसेवक औदंबर कदम, तानाजी कदम, किशोर साठे, मिलींद रोकडे, जिवण कदम, आनंद कदम, आबासाहेब कापसे, ॲड गिरीश लोहारेकर, निलेश रोचकरी, रुषीकेश साळुंके, अजय धनके, दुर्गश साळुंके, गोविंद तावसकर, बबलु सय्यदसह शिवभक्त आदी उपस्थित होते.