केटीआर यांच्या वाढदिवसानिमीत्त नळदुर्ग येथील शेकडो महिलांचा बीआरएस मध्ये प्रवेश

केटीआर यांच्या वाढदिवसानिमीत्त नळदुर्ग येथील शेकडो महिलांचा बीआरएस मध्ये प्रवेश
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के . चंदशेखर राव यांचे सुपूत्र , तेलंगणा राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योगमंत्री के . तारक रामाराव (केटीआर) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दि. २३ जुलै रोजी नळदुर्ग ता . तुळजापूर येथील शेकडो महिला व नागरीकांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचे महाराष्ट्र राज्य मिडीया समन्वयक तथा धाराशिव जिल्हा समन्वयक प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते भारत राष्ट्र समिती पक्षात जाहिर प्रवेश केला .
भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के . चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्याकडे असलेली सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकासाची दूरदृष्टी त्यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन, महाराष्ट्रातील सध्याच्या गढुळ राजकिय परिस्थितीचा रोष व्यक्त करीत आम्ही सर्वजण भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करीत असल्याचे सर्वांनी प्रशांत नवगिरे व उपस्थितांना सांगितले .
याप्रसंगी मार्गदर्शन करताना, प्रशांत नवगिरे यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासनाकडुन होत असलेल्या अडचणी व अन्याय दूर करून, याठिकाणच्या बेरोजगार महिलांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तेलंगणाचे उद्योगमंत्री केटीआर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
यावेळी मिडीया जिल्हा समन्वयक सुनिल गव्हाणे, शहर समन्वयक अझर शेख, शहरसचिव अहमदअली मनियार, महिला शहर समन्वयक रंजना ठोंबे, अन्वर शेख, शेखअली शेख, बशीर बागवान, रशीद जागिरदार, महेबुब मौजन, खालेद मौजन, शांता सोमोशे, कस्तुरा चौगुले, यशोदा बनसोडे, सुगरा बागवान, आश्विनी नागिले, सोनू धोत्रे, महेताबी बागवान, हालिमा शेख, सुरेखा बनसोडे यांच्या सह शेकडो महिला व नागरीक उपस्थित होते .