राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या धाराशिव युवक जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ बनसोडे यांची निवड
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या धाराशिव युवक जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ बनसोडे यांची निवड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळ
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील पत्रकार सोमनाथ बनसोडे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या धाराशिव – उमरगा लोहारा – तुळजापूर युवक जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप यांनी बनसोडे यांना निवडीचे पत्र दिले आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या धाराशिव जिल्हयातील कार्यकत्यांची महासंघाचे राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष महादेवजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव येथे दि.१० डिसेंबर रोजी जत्रा फंक्शन हॉल येथे नुकतीच बैठक संपन्न झाली.
सोमनाथ बनसोडे यांच्याकडे यापूर्वी महासंघाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. बनसोडे यांनी ग्रामीण भागातील आणि तळागाळातील वंचित समाजात संत रोहीदास महाराज, डॅा.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे कार्य व त्यांचे विचार चर्मकार महासंघाच्या माध्यमातून पोहचविण्याचे काम चांगल्या प्रकारे केले.
संघाच्या माध्यमातून वंचित समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना युवक जिल्हाध्यपदाची जबाबदारी देण्यात आली.