ब्रेकिंगमहाराष्ट्र
भविष्यातील आजार टाळण्यासाठी नागरिकांनी भरड धान्याचा वापर करावा-रामदास कोळगे

भविष्यातील आजार टाळण्यासाठी नागरिकांनी भरड धान्याचा वापर करावा-रामदास कोळगे
धाराशिव /न्यूज सिक्सर
नागरिकांनी रोजच्या आहारात ज्वारी बाजरी,नाचणी राळे, सावा, भगर अशा भरड धान्याचा आहारात वापर केला तर बिघडत चाललेली माणसाची आरोग्य व्यवस्था ही सुरक्षित राहिल व भविष्यात होणाऱ्या आरोग्याच्या समस्या टाळता येतील असे मत धाराशिव जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्कप्रमुख रामदास कोळगे यांनी आंबेवाडी ता. धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने भरड धान्य संदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते श्री.कोळगे पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून 2023 हे वर्ष जागतिक भरड धान्य म्हणून घोषित केले आहे या भूमिकेमध्ये आपल्या देशाचा पुढाकार महत्त्वाचा आहे मानवाला अनेक आजाराने ग्रासले आहे त्याच्यामध्ये स्थूलता लठ्ठपणा,उच्च रक्तदाब, हृदयविकार,मधुमेह, कर्करोग, अशा विविध दुर्धर व्याधीनी अनेक माणसे त्रस्त आहेत त्याचबरोबर प्रत्येकाची पचन संस्थेची प्रतिकार शक्ती देखील कमी झालेली आहे त्यामुळे विविध आजारास माणूस बळी पडत आहे याला वेळीच आवर घालण्यासाठी भरड धान्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांनी भरड धान्याचा आहारात मोठ्या प्रमाणामध्ये समावेश करावा व भविष्यात येऊ घातलेल्या आजार टाळावेत असे शेवटी कोळगे यांनी सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश देशमुख धाराशिव पंचायत समितीचे माजी सभापती तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमास यावेळी उपस्थित शिवाजी इतबारे, सुग्रीव मोरे, हनुमंत क्षिरसागर सुभाष झेंडे मारुती सुरवसे प्रभाकर, इंगळे, महादेव दरेकर, पांडुरंग जाधव, तुकाराम दरेकर, त्र्यंबक क्षीरसागर, सुनील पवार, बळवंत कदम, जयपाल क्षीरसागर, तुकाराम दळवे यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती