तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथील शेतरस्ता खुला करून द्यावा ! किंवा आत्माहत्या करण्यास पवानगी देण्यात यावी !

तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथील शेतरस्ता खुला करून द्यावा !
किंवा आत्माहत्या करण्यास पवानगी देण्यात यावी !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथील गट नं ६० व ५९ च्या सर बांधावरचा शेतरस्ता खुला करुन देणे विषयी टाळाटाळ करीत सर्व गोष्टीच्या निशेर्धात आत्माहत्या करण्यास परवानगी मिळणे दि.२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे यांना तीन वर्षा पासून मसूल प्रशासनाचे उंबरटे जिजवत त्रस्त
शिवाजी गोरोबा दांगट यांनी टोकाची भूमिका घेतली आहे.
निवेदनावर असे नमूद केले आहे कि मी भांतव्री शिवारात शेत जमीन असून शेतीला जाणे-येणे करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आम्हा कुंटूंबा वरती उपासमारीची वेळ आली आहे. या विषयी. महसूल कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. तहसीलदार तुळजापूर यांचे आदेश, उपविभागीय जिल्हाधिकारी यांचे आदेश, अपर जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत.तरी मंडळ अधिकारी व तलाठी उडवा उडवीचे उत्तर देत आहेत. दि ०६/०५/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणास बसले असता येता १५ दिवसात शेतरस्ता खुला करुन देतो असे लेखी पत्र देण्यात आले मात्र आजगत या विषयीचे कोणीच दखल घेतली नाही. येत्या ०८ दिवसा मध्ये रस्ता खुला न झाल्यास शेतकरी महूसल मंत्री मंत्रालय . मुंबई यांच्या दाद मागण्यात येईल. या विषयाचे गंभिर्याने दखल घ्यावी व दोषीवर कठोर कारवाईचे आदेश काढन्यान यावे या विषयी आपण स्वता: जायमोक्यावर हजर राहून सर्व यंत्रना सोबत घेऊन मंगरुळ डांबरी रस्ता ते तिर्थ (खुर्द) गावच्या • शिव रस्ता पर्यंत रस्ता खुला करुन देण्यात यावी अन्यथा आत्माहत्या करण्यास पवानगी देण्यात यावी असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर शेतकरी दांगट शिवाजी यांची साक्षरी आहे.