१ हेक्टर खरेदीच्या नावाखाली ०३ हे ३५ आर. गट नं. १८५ मधील जमीन फसवणुक करुन खरेदी केली

१ हेक्टर खरेदीच्या नावाखाली ०३ हे ३५ आर. गट नं. १८५ मधील जमीन फसवणुक करुन खरेदी केली
मंडळ अधिकारी अमर गांधले,तलाठी पवार, रजिस्टर घुगे यांना निलंबीत करूर शेतकऱ्यांना न्याय द्यावा
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील १ हेक्टर खरेदीच्या नावाखाली ०३ हे ३५ आर. गट नं. १८५ मधील जमीनीचा सातबारा कोरा करुन फसवणुक करुन खरेदी केल्याबाबतत. दि.२४ जुलै रोजी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांना त्रस्त शेतकरी चंद्रकांत पंढरीनाथ पाटील, त्यांचा मुलगा रामहरी चंद्रकांत पाटील यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे कि,
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील रहिवाशी चंद्रकांत पंढरीनाथ पाटील यांची गट नं. १८५ मधील ०१ हे जमीनीच्या खरेदीच्या नावाखाली ०३ हे. ३५ आर., जास्त जमीन फसवणुक करुन खरेदी केली आहे. सदर जमीनी संदर्भात कोणताही फेरबदल (फेरफार) ओडु नये म्हणून दि. २५/०४/२०२३ मंडळ अधिकारी अमर गांधले व तलाठी पवार यांना निवेदन दिले होते. तरी सुध्दा संबंधित अग्नीवेश शिंदे यांच्या सोबत संगनमत करुन चिरीमीरी घेवुन फेर ओडण्यात आला आहे. त्या संदर्भात तीन सुनावणी सुध्दा झाल्यात तीसरी सुनावणी दि. १२/०७/२०२३ रोजी झाली सुनावणीचा निकाल वारसांचा कोणताही विचार न करता निकाल मंडळ अधिकारी यांनी चिरीमीरी घेवुन शिंदेच्या बाजुने निकाल दिला आहे.त्यांचा मुलगा रामहरी चंद्रकांत पाटील यांचा गेल्या ३० वर्षापासुन शेतावर कब्जा आहे.
चंद्रकांत पाटील याचे वय ८० वर्ष आहे वयोवृध्द असल्याचा फायदा घेवून व दारु पाजुन नशेत जमीन हडप केली आहे. तर अशा मंडळ अधिकारी अमर गांधले,तलाठी पवार, रजिस्टर घुगे यांनी संगनमत करुन ०३ हे. ३५ आर
दि.०३/०४/२०२३ रोजी जमीन हडप केली. अशा अधिकाऱ्यास निलंबीत करुन रजिस्टरी रद्य करुन शेतकऱ्याला न्याय द्यावा असे निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनावर चंद्रकात पंढरीनाथ पाटील, रामहरी चंद्रकांत पाटील (मुलगा) राहुल रामहरी पाटील (चंद्रकांत पाटील यांचा नातु) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
०१ हेक्टर जमीनीपैकी ०३ हे ३५ आर., फसवणुक दि. ०३/०४/२०२३ रोजी खरेदी केली आहे, आणि एकाच दिवशी दोन रजिष्ट्री केल्या आहेत.माहितीस्तव निवेदन मा. मुख्यंमत्री एकनाथजी शिंदे, सचिवालय, उस्मानाबाद.तानाजी सावंत, पालकमंत्री उस्मानाबाद.
जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, कार्यालय उस्मानाबाद. यांना निवेदन दिले आहेत.