मोहोळ पोलीसांची गुटखा तस्करावर धडाकेबाज कारवाई ४७ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात

मोहोळ पोलीसांची गुटखा तस्करावर धडाकेबाज कारवाई
४७ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात
मोहोळ /न्यूज सिक्सर
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण अमोल भारती व मा. पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस
स्टेशन विनोद घुगे यांना सोलापूर ते पुणे हायवेवरुन पुणेचे दिशेने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या अन्न
पदार्थ गुटख्याचे आयशीर टेम्पोमधून वाहतुक होणार आहे अशी खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्याने मिळालेल्या
माहितीप्रमाणे अवैध गुटख्यावर कारवाई करावयाचे आदेश दिले. सदर आदेशाप्रमाणे सपोनि राजकुमार डुणगे,
पोहेकॉ/१०५० निलेश देशमुख, पोना / १८२६ अशपाक शेख, पोकॉ/९८५ मंगेश बोधले, पोकॉ/१८८९ वसिम शेख व
पोकॉ/११०१ कैलास डाखोरे व चालक हरिदास आंदलिंगे असे मिळून मोहोळ येथील कन्याप्रशाला चौकात हजर
राहुन सोलापूरहुन पुणेच्या दिशेने जाणा-या वाहनावर लक्ष ठेवून असताना दिनांक २५/०४/२०२३ रोजी रात्री
०१:१५ वाजणेचे सुमारास सोलापूरहुन पुणेचे दिशेने एक लाल रंगाची आयशीर टेम्पो क्रमांक टी.एस. १२
४३५३ आल्याने सदर टेम्पोस थांबवून चालकास त्यांचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नांव कासिम मैनोद्दिन
गोलंदाज, रा. चिंचोली, सहयाखान, तालुका निलंगा, जि. लातूर असे सांगून टेम्पोमध्ये गुटखा सुपारी असुन
सदर मालाची बिल्टी नसल्याचे सांगितले. आम्हांस सदर वाहनामधील मालाचा संशय आल्याने आम्ही
टेम्पोमधील मालाची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्न पदार्थ बाराती
पानमसला व बी ९ तंबाखुचे एकुण ६० पोती मिळून आल्याने सदरील मुद्देमाल व आयशीर ट्रक असा एकुण
४७,४०,०००/- रुपयेचा मुद्देमाल ताब्यात घेणेत आला आहे. तसेच ट्रक चालक कासिम मैनोद्दिन गोलंदाज, रा.
चिंचोली, सहयाखान, तालुका निलंगा, जि. लातूर यांस जागीच ताब्यात घेण्यात आले आहे.
पुढील कायदेशीर कारवाई करीता सदरबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग यांना कळवून त्यांचे कादेशीर
फिर्याद वरुन मोहोळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३३१ / २३ कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ व सहकलम अन्न
व सुरक्षा मानके कायदा २६ (२) (I), २६ (२)(II), २६ (१) (IV), २७ (३) (ई), ३० (२) (A) ५९ प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रतिबंधीत पान मसाला व गुटखा कोठून आणि कोणाकडून घेऊन आले
आहे ते कोठे विक्रीसाठी कोठे कोणाकडे घेऊन जात होता याबाबत पुढील तपास सपोनि राजकुमार डुणगे
करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, मा. हिमंत जाधव, अप्पर
पोलीस अधिकक्षक सोलापूर ग्रामीण त्यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अमोल भारती – उपविभागीय पोलीस
अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग, श्री. विनोद घुगे – पोलीस निरीक्षक मोहोळ पो.स्टे. यांचे नेतृत्वाखली
सपोनि राजकुमार डुणगे, पोहेकॉ/१०५० निलेश देशमुख, पोना / १८२६ अशपाक शेख, पोकॉ/९८५ मंगेश
बोधले, पोकॉ/१८८९ वसिम शेख व पोकॉ/ ११०१ कैलास डाखोरे व चालक हरिदास आंदलिंगे सर्व नमणुक
मोहोळ पोलीस स्टेशन यांनी पार पाडली आहे.