
श्री भैरवनाथाच्या भेंडोळीचा उत्सव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री काळभैरवनाथाच्या भेंडोळीचा उत्सव सोहळा रविवारी (१२. नोव्हेंबर) दीपावलीतील दर्श अमावास्येदिवशी सायंकाळी सात वाजता साजरा होत आहे. देशात श्रीक्षेत्र काशीनंतर तुळजापूर येथील होळीच्या या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
श्री तुळजाभवानीमातेच्या उजव्या बाजूला काळभैरवाचे उंच कड्यावर प्राचीन मंदिर आहे. शहराचा आद्य नागरिक म्हणून या काळभैरवाला मानाचे स्थान असून, या मंदिराचा इतिहास तुळजाभवानीच्या मंदिराशी निगडित आहे. यावेळी पृथ्वीभ्रमण करताना विश्वजननी पोहोचली. त्यावेळी तिच्यासाठी इच्छितस्थळ (जागा) शोधण्याचे काम काळभैरवावर सोपविले होते. जागा शोधून झाल्यावर काळभैरवाने स्वतः त्याठिकाणी वास्तव्य केले.राग अनावर झालेल्या मातेने सिहासनाला येते. काळभैरवाच्या श्रीमुखात भडकावली अशी आख्यायिका आहे.
श्री तुळजाभवानी मातेचा रोज अभ्यंगस्नान दिवाळीतील चार दिवस श्री तुळजाभवानीमातेलाही अन चालण्याची प्रथा प्रचलित आहे. यावेळी पहाटे चरण तीर्थ काकडा आरती पार पडून मातेची नित्य पूजा केली जाते. त्यानंतर मातेला सुगंधी तेल अन्तर, सुगंधी उटण्यासह केशर, अरगडा, चंदन, गुलाल, बुक्का लावून पंचामृत अभ्यंगस्नान घालण्यात येते. त्यानंतर फराळाचा नैवेद्य मातेला दाखविला जातो.
मंदिर संस्थानकडून महंतांचा मानसन्मान केला जातो. महंत मंदिरात पोहोचल्याची वर्दी मिळताच काळभैरवनाथाच्या कड्यावरून भेंडोळीचे तुळजाभवानी मंदिरात आगमन होते. पेटलेली भेंडोळी मातेसमोर भवानी शंकरासमोर गोल प्रदक्षिणा पार पडते. दत्त मंदिरावळ महतांकडूनही मंडळीला तेल अर्पन करण्यात येते. त्यानंतर भेंडोळी मंदिर प्रदक्षिणा घालून महाद्वार रोड, आर्य चौकमार्गे डुल्या मारुतीच्या पारावर विसावत आसते