“विरोधकांच्या छातीत धडकी भरली, स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेताहेत”;माजी मंत्री मधुकराव चव्हाण यांचा हल्लाबोल !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापुर

“विरोधकांच्या छातीत धडकी भरली, स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेताहेत”;माजी मंत्री मधुकराव चव्हाण यांचा हल्लाबोल !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
विरोधकांवर निशाणा साधत”विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मधुकरराव चव्हाण यांचा गट ठरतोय वरचढ , ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे”तुळजापुर शहरातील भगवती मंगल कार्यालय धाराशिव रोड येथे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वतीने सोशल मीडिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य यशराज पारखी – पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी सोशल मीडिया युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी मधुकरराव चव्हाण यांनी पुन्हा एकदा मतदार संघात आपले पकड निर्माण केली आहे. चव्हाण यांच्या पाठीमागे मोठा जनमानस असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या असलेल्या मेळाव्याला होत असलेली गर्दी पाहून विरोधकाची धडकी बसली आहे.यावेळी व्यासपीठावर माजी बांधकाम सभापती मुकुंद दादा डोंगरे ,पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड ,नगरसेवक सुनील रोजकरी ,उद्योजक विनीत रोजकरी ,सुदर्शन वाघमारे ,राहुल भालेकर यांच्यासह पत्रकार व कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्ते या सोशल मीडियाच्या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित होते.