माऊली न्युज चैनलच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

माऊली न्युज चैनलच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
माऊली न्युज चैनल सन २०२४ या वर्षाच्या दिनदर्शिकचा प्रकाशन सोहळा दि. ८ फेब्रुवारी रोजी तहसिलदार अरविंद बोळंगे व पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तहसिल कार्यालय वे पोलिस ठाणे तुळजापूर येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी यांच्या बातमी मुळे शहरातील माहिती होते तर त्यामधील सत्यता ही कळते आपल्या लेखणीतून मांडलेही कुठलीही जाहिराती ची अपेक्षा न करता केलेल्या कामाची प्रसिद्धी देतात असे तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी बोलताना सांगीतले.
यावेळी युवा उद्योजक राहुल भोसले, जिल्हा पत्रकार संघाचे श्रीकांत कदम, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके,मराठा ठोक क्रांती मोर्चा चे महाराष्ट्र राज्य समन्वयक आबासाहेब कापसे, रोटरी क्लबचे सचिव प्रशांत अपराध, स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, बालाजी नखडे, पंकज घोडके, अमर चोपदार , पत्रकार सुरज बागल, आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार आबासाहेब कापसे यांनी मानले,