
लोहारा-प्रतिनिधी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिव मार्फत भाषा व गणित विषयाची केंद्रस्तरीय निपुनोत्सव,तालुकस्तरीय निपुनोत्सव स्पर्धा घेण्यात आली. तालुक्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय निपुनोत्सव स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिव येथे घेण्यात आली.यामध्ये लोहारा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथील पहिलीची विद्यार्थीनी स्वानंदी बालाजी नाईक हिने भाषा विषयात जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवला.तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तापुर येथील दुसरी वर्गातील विद्यार्थी विराज विनोद डोंगरे भाषा विषयात जिल्ह्यात द्वितीय,तर तिसरी वर्गात गणितात तथागत सचिन डावरे हा जिल्ह्यात तृतीय आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहारा (खुर्द) येथील विद्यार्थींनी शर्वरी नरेंद्र आवटे ही गणितात द्वितीय आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा (रवा) येथील तिसरीची विद्यार्थीनी स्वरांजली शरद जाधव भाषा विषयात जिल्हयात तृतीय आली.विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद,विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, भास्कर बेशकराव,पांडुरंग खंडाळकर,केंद्रप्रमुख विश्वजित चंदनशिवे,मारुती डोकले,नागनाथ जट्टे,बालाजी पवार,नंदकुमार पोटरे,जीवन गायकवाड,मुख्याध्यापक मधुकर रोडगे, दाजीबा साबळे,श्रीम.उलन कांबळे,गणपती राठोड,वर्गशिक्षक महानंदा चव्हाण,मनिषा भोजने,नरसिंह कुलकर्णी,दिपक हुंजे,विकास घोडके,मधुबाला आवटे, बालाजी नाईक,मोहन शेवाळे,राजू माळवदकर,लिंबराज बनकर,काकासाहेब इंगळे,नयन शेख,गजानन मक्तेदार,सुदर्शन जावळे,रामभाऊ मुसांडे,नितीन वाघमारे, रसूल शेख यांच्यासह तालुक्यातील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.