अपसिंगा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार ? माहिती अधिकाराला कोलदांडा, सरपंच ग्रामसेवकाची चुप्पी
अपसिंगा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार ? माहिती अधिकाराला कोलदांडा, सरपंच ग्रामसेवकाची चुप्पी

- अपसिंगा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार ? माहिती अधिकाराला कोलदांडा, सरपंच ग्रामसेवकाची चुप्पी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत राबवल्या गेलेल्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माजी सदस्य नागनाथ खोचरे यांनी केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीकडे लेखी तक्रार दिलेली आहे. अपसिंगा ग्रामपंचायतचे माजी
सदस्य नागनाथ खोचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ ते २०२२ या काळात ते ग्रामपंचायत सदस्य होते. या काळामध्ये ग्रामपंचायतीमार्फत बंदिस्त गटार, अंगणवाड्यासाठी, गाव स्वच्छतेसाठी खरेदी केलेल्या कचराकुंडी, मुतारी, गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे यासाठी झालेल्या खर्चाची माहिती मिळावी म्हणून २९ जून २०२२ आणि ०१ मार्च २०२३ रोजी जन माहिती अधिकारातून
माहिती मागितली होती. मात्र ती ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली नाही. असे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायतीला स्मार्ट व्हिलेज, अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार, पेपरलेस ग्रामपंचायत याचे बक्षीसापोटी मिळालेली रक्कम विकास कामासाठी ग्रामपंचायतीमार्फत खर्च करण्यात आलेली आहे. २०१७ ते २०२२ या काळात ग्रामपंचायतीमार्फत
झालेल्या सर्वच कामांची आणि खर्चाची तपासणी करण्यात यावी याकरिता जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३१ मार्च २०२३ रोजी खोचरे यांनी लेखी तक्रार देऊन आपली कैफियत मांडली आहे. जन माहिती अधिकाराला देखील ग्रामपंचायतीने उत्तर दिलेले नाही. परिणामी ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.