डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी बंद केलेले बुद्ध विहार तात्काळ बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी बंद केलेले बुद्ध विहार तात्काळ बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी
धाराशिव/न्यूज सिक्सर
मौ कानेगाव ता.लोहारा येथील बौद्ध समाजाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी तात्काळ परवानगी देउन जातीयवादी गावगुंडानी बंद केलेले बुद्ध विहार तेथील बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( खरात ) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद यांचे कडे करण्यात आली आहे संपूर्ण भारत देशामध्ये दर साला प्रमाणे या ही वर्षी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी केली जात आहे मौजे कानेगाव तालुका लोहारा जि धाराशिव येथील बौद्ध समाजाला डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावयाची आहे म्हणून उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाकडे कायदेशीर परवानगी मागितली आहे. परंतु जिल्हा पोलीस प्रशासनाने महापुरुषांच्या जयंतीला परवानगी नाकारली असल्याने येथील बुद्ध समाजाने आज गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. संविधानात्मक अधिकार आणि हक्क येथील जातीयवादी लोक व जिल्हा प्रशासन बजाऊ देत नाहीत या त्रासाला कंटाळून या गावातील बौद्ध समाजाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर गाव बसवण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे येथील दोन समाजामध्ये निर्माण झालेला वाद गेली पाच ते सहा वर्षांपासून चालू आहे बौद्ध समाजाचे असलेले बुद्ध विहार तेव्हापासून आजपर्यंत जातीवादी लोकांनी व जिल्हा प्रशासनाने बंद करून टाकले आहे ते बुद्ध विहार खुले करून देण्यात यावे व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी या गावातील बौद्ध बांधवांना तात्काळ पोलीस संरक्षण देऊन संबंधित जातीवादी गाव गुंडावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीची निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड उस्मानाबाद तालुकाध्यक्ष संपत सरवदे चंदू भालेराव बालाजी माने समाधान सरवदे किरण आवटे महादेव शिंदे अंकुश ओव्हाळ मुकेश मोटे तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे युवक जिल्हाध्यक्ष रंजीत मस्के आदीच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत