श्री शंभु महादेव देवस्थान उपाध्यक्ष रामकृष्ण जगताप (कारभारी) अनंतात विलीन
पत्रकार -गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील शेतकरी तथा श्री शंभु महादेव देवस्थान भातागळी उपाध्यक्ष रामकृष्ण जगताप(कारभारी) वय (७६) त्यांच्यावर लातुर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना दि.१० मार्च रोजी प्राणज्योत मावळली.
मनमिळाऊ शांत स्वभावाचे सर्वांना आपुलकी ने बोलणारे दादा या नावाने म्हणून रामकृष्ण जगताप ऊर्फ दादा यांची ओळख होती.गावातील परिसरातील नागरिकांशी त्यांची नाळ जोडलेली होती.वारकरी,आध्यात्मिक क्षेत्रात नेहमी आग्रही राहत.त्यांच्या निधनाचे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर दि.११ रोजी सोमवारी सकाळी ११:१५ वाजता भातागळी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.अंतविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर,वारकरी संप्रदायातील तसेच गाव व परिसरातील नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात संख्येने होती.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,चार बहीण,दोन भाऊ,भावजया,नातवंडे असा मोठा परिवार आहे.