नळदुर्ग शिवारात विज कोसळून दोन म्हशिंचा मृत्यू

नळदुर्ग शिवारात विज कोसळून दोन म्हशिंचा मृत्यू
वागदरी/न्यूज सिक्सर
नळदुर्ग व परिसरात (ता.तुळजापूर) वादळी वारा व विजेच्या कडकडाटा सह झालेल्या अवकाळी पावसात विज कोसळून दोन दुभत्या म्हसीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दि.७ मे २०२३ रोजी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले व वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटात जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या अवेळीच्या पावसाने शेतकऱ्यासह सर्वांची तरांबळ उडाली विजेचा कडकडाट भयावह होता. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात नळदुर्ग शिवारात सर्वे न.,११२ मध्ये विज कोसळून शेतजमीन बटईने करणारे वागदरी ता.तुळजापूर येथील शेतकरी बाबासाहेब कुंडलीक वाघमारे यांची लिंबाच्य झाडाखाली बांधलेली म्हैस व याच सर्वे नंबर मध्ये बटईने शेतजमीन करणारे करणारे वागदरी ता.तुळजापूर येथील शेतकरी अंबादास सदाशिव भोसले यांची एक म्हैस असा एकूण दोन म्हसीचा दुर्दैवी म्रुत्यु झाला आहे.
सदर घटनेचा नळदुर्ग महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जे.एस.गायकवाड ,पशुवैद्यकीय अधिकारी खाडे साहेब यांनी रितसर पंचनामा केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी असी मागणी शेतकरी वर्गातून होते आहे.