आष्टा कासार येथे बुध्द जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

आष्टा कासार येथे बुध्द जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
वागदरी /न्यूज सिक्सर
लोहारा तालुक्यातील आष्टा कासार जिल्हा उस्मानाबाद येथे तथागत भगवान बुद्धाची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
बुद्ध जयंतीचे औचित्य साधून येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने लुंबिनी बुद्ध विहार ट्रस्ट आणि वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रात माजी ग्रंथालय व माहिती अधिकारी डॉ. डी. टी. गायकवाड व सुप्रसिद्ध गायक श्रीराम पोतदार यांचे हस्ते धम्म ध्वजारोहण व भगवान बुद्धाची पूजा संपन्न झाली यावेळी बाबुराव कांबळे बलभीम गायकवाड, प्रा. आर जी गायकवाड, प्रा. राजेंद्र सोनवणे,अविनाश कांबळे, दत्ता गायकवाड, महादेव लिंबाजी गायकवाड, सदाशिव कांबळे, मधुकर गायकवाड, प्रवीण गायकवाड, हनुमंत गायकवाड, दत्ता ज्ञानू गायकवाड विठ्ठल गायकवाड, किसन कांबळे रोहित राहुल गायकवाड, गिरजप्पा कांबळे, उत्तम निराप्पा कांबळे, दिलीप केरबा गायकवाड, नागनाथ नामदेव गायकवाड, व संबोधी महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या सामुदायिक त्रिसरण, पंचशील, बुद्धपूजा गाथा, धम्मगाथा व भीमस्मरण घेऊन वंदन करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सायंकाळच्या सत्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. डी.टी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पुरोगामी विचारवंत प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांचे जाहीर व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी पुणे येथील समीक्षा फाउंडेशन च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. डी.टी. गायकवाड लिखित ‘धम्मसंवाद’ व प्रा. गौतम गायकवाड संपादित ‘दत्तात्रय गायकवाड यांचे साहित्याची समीक्षा आस्वाद’ ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच वसंत सुलतानपुरे , प्रकाश आळंगे,सरपंच आप्पाराव आल्लिसे, सयाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल सोमवंशी इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले,आजची ग्रंथालये ही ज्ञानाचे स्रोत आहेत. यामध्ये तरुण महिला व गावातील समस्त लोकांनी ज्ञानाच्या संपादनाची संधी घ्यावी. ग्रंथालयात आपण उद्याचे नागरिक घडवू शकतो. आष्टा कासार हे गाव धार्मिक असून या गावांमध्ये विविध बहुषुत व जाणकार व्यक्तिमत्व तयार झालेले आहेत आष्टा कासार या गावाचे नाव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. यासाठी नागरिकांनी या सार्वजनिक ग्रंथालयाचा भरपूर लाभ घ्यावा व उद्याची उत्तम पिढी घडवावी ग्रंथालयात या चळवळीची व विचारवंतांच्या विचारांचा जागर केला जातो.यासाठी आपणही विचाराचा जागर करावा असे नम्र आवाहन यावेळी रोडे यांनी केले.
तसेच यावेळी त्यांच्यासोबत साहित्यिक जाधव आणि खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.गौतम गायकवाड यांची विशेष उपस्थित होती. यावेळी ग्रंथालयाचे पदाधिकारी व अध्यक्ष डॉ. म.ना.गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती निमित्त संस्थेतर्फे विशेष सत्कार ही करण्यात आला त्याचप्रमाणे पदाधिकारी प्रा.आर.जी.गायकवाड.राजेंद्र सोनवणे एल.एस.गायकवाड अजिंक्य कांबळे ग्रंथपाल कल्याणी कांबळे विठ्ठल गायकवाड यांचा ग्रंथालयाच्या रोप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त रोडे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते फेटा शाल हार देऊन सत्कार करण्यात आला.याचवेळी दोन व्यासंगी वाचकांचा शहाजी समोसे व कुडकले यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज कोडुकले व मुकेश सोमवंशी आभार प्रदर्शन शिवाजी कांबळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता बलभीम गायकवाड; महादेव लिंबाजी गायकवाड; सदाशिव कांबळे; सतीश गायकवाड; मधुकर गायकवाड; प्रवीण गायकवाड ; हनुमंत गायकवाड; दत्ता ज्ञानू गायकवाड ; विठ्ठल गायकवाड ; दयानंद टिकंबरे; बाबुराव कांबळे; स्वप्नील सोनवणे; मनोज सतीश गायकवाड; गौतम वीराप्पा कांबळे; सागर तिपाना गायकवाड; गोपाळ कांबळे; सुधीर गायकवाड ,; अरुण रणे ; शंकर दयानंद गायकवाड ; महादेव वाघोबा गायकवाड सौरभ व्यंकट गायकवाड ; बाळाप्पा बलभीम कांबळे ; महादेव वाघोबा गायकवाड; मलकू कांबळे; अमर कांबळे शाहूराज गायकवाड; ऋतिक उत्तम गायकवाड यांनी प्रयत्न केले.