केंद्र शासनाच्या परिपत्रका विरुद्ध आंदोलनाला 51 ग्रामपंचायतीसह लोकप्रतिनिधीचा पाठींबा-जगताप
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
खरीप 2023 संदर्भात केंद्र शासनाने अचानकपणे 30 एप्रिल 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख 19 हजार शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहेत हे परिपत्रक रद्द व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 जुलै रोजी 12 ते 4 या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार असून या धरणे आंदोलनाला खासदार ओमराजे निंबाळकर ,आमदार कैलास दादा पाटील ,माजी आमदार राहुल मोटे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सरचिटणीस प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्याच्या अध्यक्ष सक्षणाताई सलगर ,राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरचिटणीस आदित्य गोरे ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळजापूरचे नेते अशोक जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा तालुकाध्यक्ष नाना पाटील शिवसेना बोभाटा गटाचे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार तसेच जिल्ह्यातील विविध 51 ग्रामपंचायतीने या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
26 जून 23 च्या परिपत्रकानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये मिळणार आहेत मात्र केंद्राच्या नव्या परिपत्रकामुळे केवळ एक हजार रुपये मिळतील 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र कमी असलेला शेतकऱ्यांना तर काहीच मिळणार नाही म्हणून हे परिपत्रक रद्द व्हावे यासाठी अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली 26 जुलै रोजी 12 ते 4 या वेळेत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे . या परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्याचे 900 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान देखील अनिल जगताप यांनी केले आहे.