नळदुर्ग-मैलारपूर श्रीखंडोबा यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांची दंगल ठरली स्मरणीय महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने जिंकली पहिल्या क्रमांकाची कुस्ती

नळदुर्ग-मैलारपूर श्रीखंडोबा यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांची दंगल ठरली स्मरणीय
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने जिंकली पहिल्या क्रमांकाची कुस्ती
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
हालग्याचा कडकडाट, तुतारी आणि समालोचकांची चितपट करणारी वाणी यामुळे (मैलारपूर) नळदुर्ग येथील भव्य कुस्त्यांची दंगल स्मरणीय ठरली. कोल्हापूर, सांगली. लातूर, उस्मानाबाद , सोलापूर , येथे कुस्ती शिकणा-या असंख्य पैलवानांनी तब्बल सहा तासापेक्षा जास्त वेळ प्रेक्षकांना मैलारपुरच्या माळराणावर आक्षरशा बांधून आणि खिळवून ठेवले. मानाची एक लाख एकावन्न हजार दोन किलो चांदीची गदा असलेली पहिल्या क्रमांकाची भव्य कुस्ती विद्यमान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने जिंकली. उत्तरप्रदेश केसरी असलेल्या सेना दलाच्या मोहीत कुमारवर पृथ्वीराज पाटील याने काही मिनिटात मात केली.
शनीवार (ता.सात) रोजी दुपारीच कुस्ती शौकीनांना मैलारपूरचे वेध लागले होते. मल्लांचे आराध्य दैवत श्री हनुमानाच्या पुजनाने आखाड्यात नारळ वाढवला व बाल मल्लांच्या कुस्त्यांनी स्पर्धेस सुरूवात झाली. विविध वय व वजन गटातील पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. राजाभाऊ देवकते यांनी धावते समालोचन केले. आखाडा प्रमुख शिवाजी व-हाडे गुरूजी, विनोद घुगे, डाॕ. प्रमोद घुगे, धनराज भुजबळ, सुधाकर चव्हाण पंच म्हणून काम पाहिले. हातलाई कुस्ती संकूल उस्मानाबाद, संभाजी पवार व्यायामशाळा सांगली, जय हनुमान आखाडा कुर्हाळी या ठिकाणच्या पैलवानानी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काॕग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांनी पहिल्या क्रमांकासाठी एक लाख ५१ हजार रोख बक्षिस तर नरहरी बापुराव पुदाले यांच्या स्मरणार्थ पुदाले परिवाराकडून चांदीची गदा महाराष्ट्र केसरी प्रथ्वीराज पाटील यांनी पटकावली.
यावेळी राष्ट्रवादी काॕग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे, डाॕ नितीन ढेपे, कमलाकर चव्हाण यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, कुस्तीशौकिण उपस्थित होते. मैलारपूर कुस्ती आयोजन समितीचे राजा ठाकुर, अनिल पुदाले, बंडू पुदाले, रमेश जाधव , संजय मोरे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.