छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी गरड,उपाध्यक्षपदी खराडे आणि होंडराव तर सचिवपदी माळी
Post-गणेश खबोले

लोहारा (प्रतिनिधी)
अखंड हिंदूस्थानचे आराध्यदैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक, विश्ववंद्य, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, योगीराज,श्रीमंतयोगी, श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव समिती च्या अध्यक्ष पदी योगेश गरड,उपाध्यक्षपदी रोहन खराडे,सहउपाध्यक्ष वैभव होंडराव तर सचिवपदी वसचिन माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महात्मा बसवेश्वर मंदिरात बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत उत्सव समितीची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी कोषाध्यक्ष शशिकांत माळी,आदेश माळवदकर,प्रविण कदम मिरवणूक प्रमुख ऋषिकेश मुळे,अमर काडगावे,प्रसिद्धी प्रमुख आदेश कुंभार तर सदस्य म्हणून श्रीनिवास माळी,ओम कोरे,श्रीकांत भरारे अमिन(चाचा)सुंबेकर,सुमित माळी,अजित विरुदे,गणेश माळी,सुधीर वाघ,किशोर माळी,महेश पाटील,शाम माळी ,स्वप्निल माटे,प्रतिक भरारे,रोहित भोई,प्रतिक गाढवे, आदित्य पवार,पिल्लु माळी,अमित विरुदे,निखील मुळे,शेखर पाटील,मनीष बिराजदार निवड करण्यात आली.