संत श्री सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये अभिवादन
Post-गणेश खबोले

लोहारा(प्रतिनिधी)
दि.१५ फेब्रुवारी रोजी लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, प्रमुख अतिथी म्हणून रणजित चव्हाण,रूपला चव्हाण, पालक प्रतिनिधी श्रीनिवास माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जाधव यांनी सांगितले की, संत सेवालाल महाराज हे जगदंबा देवीचे खूप मोठे भक्त होते, ते एक गोसेवक सुद्धा होते, त्यांनी समाजातील उपेक्षित अशा गोर – बंजारा समाजासाठी कार्य करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले, अशा या थोर संतास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा श्री यशवंत चंदनशिवे यांनी तर आभारप्रदर्शन मिस सविता जाधव यांनी केले, याप्रसंगी स्कुलमधील सर्व विध्यार्थी, शिक्षक कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.