सेवानिवृत्त 7 अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ मुख्यालयात संपन्न

सेवानिवृत्त 7 अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ मुख्यालयात संपन्न
धाराशिव /न्यूज सिक्सर
सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस मुख्यालयात महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- पोलीस निरीक्षक सुनिल भिमराव गिड्डे, पोलीस उप निरीक्षक श्री. सुर्यकांत आनंदे, श्रेणी पोउपनि श्री. सुरेश जाधव, भाऊसाहेब जगताप, पोलीस सहाय्यक फौजदार- श्री. अनंत वाघमारे, पोलीस नाईक अशोक शेवाळे, पोलीस अंमलदार मधुकर काळे या 7 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ दि. 31.03.2023 रोजी पोलीस मुख्यालयातील सभागृहात मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. निरोप समारंभादरम्यान मा. पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या भावी जिवनास शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. समारंभादरम्यान नोकरीतील अनुभव कथन करताना सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार यांचे डोळे पानावले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सपोनि श्री. भराटे यांनी केले. तसेच सेवानिवृत पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या हास्ते पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.