संघर्ष नायक यशपाल सरवदे यांना नळदुर्ग येथे वाहण्यात आली श्रध्दांजली

संघर्ष नायक यशपाल सरवदे यांना नळदुर्ग येथे वाहण्यात आली श्रध्दांजली
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू नेतृत्व क्रांतिकारी लढवय्य पँथर संघर्ष नायक दिवंगत यशपाल सरवदे याना नळदुर्ग ता.तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) सह विविध पक्ष,संस्था व संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रिपब्लिकन चळवळीचा बुलंद आवाज थोर विचावंत नागबोध्दी रिसर्च सेंटर उस्मानाबादचे संस्थापक यशपाल सरवदे यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. त्यांच्या दु:खद निधनाबद्दल येथील रिपाइं (आठवले) शहर शाखेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात रिपाइंचे जेष्ठ नेते दुर्वास बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली श्रध्दांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी यशपाल सरवदे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एका क्रांतिकारी बुद्धीजीवी नेतृत्वाला आपण पोरके झालो असून चळवळीत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा भावपूर्ण शब्दात उपस्थितानी त्यांना श्रध्दांजली वाहीली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले तर सुत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड यांनी केले.
यावेळी रिपाइं युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिदभाई कुरेशी,परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे, माजी सैनिक मधुकर लोखंडे, जेष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी, अँड.व्यंकट इटकरी,भिमशाहीर नागनाथ दुपारगुडे,राजेश गजधाने,मुख्याध्यापक राम बनसोडे,सहशिक्षक कल्लेश्वर गायकवाड,बाबू रठोड,रिपाइंचे ,दिनकर कांबळे,चांगदेव रणे,सुभाष गायकवाड,गेनसिध्द निकंबे,राजू गुरव,सह कार्यकर्ते उपस्थित होते.