उमाकांत मिटकर यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

उमाकांत मिटकर यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर
नळदुर्ग/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील वागदरीचे सुपुत्र तथा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरनाचे उमाकांत शिवाजीराव मिटकर यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व राज्यस्तरीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते.सन २०२४ चा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उमाकांत शिवाजीराव मिटकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर सानप यांनी उमाकांत मिटकर यांना दिले आहे.उमाकांत मिटकर यांना या अगोदर अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शैक्षिणक,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांची अभिनंदन केले आहे.
वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य केले आहे व करीत आहे.कोरोना काळात निराधार महिलांना उपजीविकेसाठी विविध साधने उपलब्ध करून देण्याचे व त्यांना आर्थिक स्थैर्य देऊन उभे करण्याचे कार्य उमाकांत मिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने केले आहे.