ब्रेकिंग
दस्तापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा..
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तापूर येथे शिक्षण सप्ताह आयोजन करण्यात आले होते मुलांना अभ्यासासोबत सामाजिक, सांस्कृतिक, इतिहासातील घडामोडी, मैदानी खेळात आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षण सप्ताह विविध उपक्रम राबविण्यात आले . यावेळी या शिक्षण सप्ताहाची सांगता सनेहभोजनाने झाली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर, सह शिक्षक अमलापुरे सर,हुंजे सर, कुलकर्णी सर शिक्षण सप्ताहची उपक्रमची माहिती दिली या वेळी शाळेचे अध्यक्ष सिद्धया स्वामी, उपाध्यक्ष सुरज डावरे , शिक्षणतज्ञ मा सैनिक रतन स्वामी,युवा प्रगतशील शेतकरी नागेश कलशेट्टी,मंगेश मदने,मा उपसरपंच गजेंद्र डावरे,राम गडदे,मा.विद्यार्थी शरद चव्हाण,गणेश गडदे,सोमनाथ कलशेट्टी व ग्रामस्थ उपस्थित होते.