देवि भक्तांच्या श्रद्धा व भावनेचा मंदिर प्रशासनाने आदर करावा-तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ
Post-गणेश खबोले

तुळजापूर-प्रतिनिधी
मागील अनेक दिवसापासून श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक कारभारात पाळकर समाजाकडून (व्यावसायीक पुजारी) चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप होवून श्री तुळजा भवानी माता,देविचे मुख्य भोपे पुजारी,मंदिर संस्थान तसेच तुळजापूरची जाणूनबुजून बदनामी करण्यात येत आहे यामुळे देवि भक्तांना त्यांच्या कुलाचाराला मुकावे लागत आहे.वास्तविक पाहता देविला विविध प्रकारचे हार पुर्वीपासूनच देविचे मुख्य भोपे पुजा-यामार्फत मंदिर प्रशासन घालत आलेला आहे.
यात प्रामुख्याने मोर पिसांचा हार,साखरेचा हार,खोबरे वाटीचा हार,विविध फुलांचा हार,नोटांचा हार,कापसांचा आरसे लावलेले हार,काजू बदाम विलायची लवंगाचा हारांचा समावेश आहे.शाकंभरी नवरात्र महोत्सवात तर फळभाज्यांचा हार घालून साजरा केला जात असतो. अशा विविधतेने देविला भक्तांनी जुन्या रूढीपरंपरेने आणलेले हार घातले जात असत. परवा एका देविभक्ताने चॉकलेटचा हार देविला दिल्याने तुळजापूरातील पाळकर समाजांनी चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेऊन मंदिर संस्थानची,देविची तसेच पुजा-यांची बदनामी केलेली आहे.
यामुळे देविचे भक्तगण मोठ्या संख्येने नाराज होत आहेत. केरळ राज्यातील अलेप्पी येथील शंकर पार्वती पुत्र असलेले कार्तिकेयच्या मंदिरात दररोज चॉकलेटचा हार घातला जातो नैवेद्य दाखविला जात आहे. भाविकांसाठी देव असतो यात भाविकांची श्रद्धा व भावनेचा विचार मंदिर संस्थानने करावा. देविला फुल लावून कौल मागण्याचा धार्मिक विधी याच पाळकर लोकांनी असाच बंद पाडला, भक्तांनी देविला आणलेली साडी देखील देविच्या अंगावरती किंवा चरणावरती जाऊ नये यासाठी ही पाळकर मंडळांनी महत्वाची भुमिका निभावलेली आहे. चॉकलेटच्या हार प्रकरणामुळे आता देविला भक्तांनी आणलेले विविध हारांना देखील घालण्यास अप्रत्यक्ष बंदीच आणत आहेत. परवा मंदिर संस्थानकडून देविभक्तांनी मोठ्या श्रद्धेने आणलेला लवंग व विलायचीचा हार घालण्यास मनाई केल्यामुळे भक्तगणांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आता केवळ सोन्या चांदीचाच हार देविला घातला जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की, मंदिर प्रशासनाच्या धार्मिक कार्यात पाळकर मंडळाच्या चुकीच्या वाढत्या हस्तक्षेपाला बळ न देता भाविकभक्तांच्या भावना व श्रद्धेला महत्व द्यावे.चुकीच्या बातम्या देवून मंदिर संस्थानची सतत बदनामी केल्याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा भोपे पुजा-यांना भाविकांच्या न्याय हक्कासाठी तसेच कुलधर्म कुलांचार टिकविण्या माठी मंदिर प्रसासन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.