
लोहारा (प्रतिनिधी)
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थीसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS ) इयत्ता ८ वी शिकत असलेल्या विध्यार्थी ची मुख्य परीक्षा दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. या परीक्षा ची पूर्व तयारी म्हणून, विध्यार्थीना एक सराव व्हावा या दृष्टीने Genius Maths Publication धाराशिव याच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय अभिरूप NMMS परीक्षा चे आयोजन केले होते सर्व पेपर PDF, OMR PDF Genius Maths Publication यांनी पुरवले. विध्यार्थी सराव व आत्मविश्वास वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा पेपर होता.
या परीक्षेमुळे वसंतदादा पाटील हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीत नक्की फरक पडेल. इयत्ता आठवीतील २८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.