
निधन वार्ता – वसंतराव अमृतराव (कदम)
तुळजापूर |
तुळजाभवानी मातेचे पुजारी वसंतराव नरसींगराव अमृतराव (कदम) (८०) यांचे बुधवार (दि १९) सकाळी वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांचा पार्थिवावर बुधवारी दुपारी तुळजापूर खुर्द येथील अमृतराव (कदम) परीवाराचा पारंपरिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, जावई असा परीवार आहे. भारतीय जनता पक्षाचे युवक नेते सचिन अमृतराव यांचे ते वडील होते.