न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अंगणवाडी मतदनीस रिक्त पदांची भरती

अंगणवाडी मतदनीस रिक्त पदांची भरती

उस्मानाबाद/न्यूज सिक्सर
महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना ह्या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी उस्मानाबाद या प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील नागरी, नगर परिषद क्षेत्रातील मानधनी अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे सरळ नियुक्तीने (By Nomination) भरण्यासाठी संबंधित नगर परिषद क्षेत्रातील स्थानिक रहिवासी महिला उमेदवारांकडून दि.07 जुलै 2023 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.उस्मानाबाद शहर (36), उमरगा (02), भूम (01), परंडा (03), तुळजापूर (01), नळदुर्ग (01), मुरुम (03) आणि कळंब (02) अशा एकूण 49 अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्तीने भरण्यात येणार आहेत.

अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती तसेच विहीत नमुना अर्जाबाबत  http://osmanabad.gov.in या संकेतस्थळावर तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांचे कार्यालय व संबंधित नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येत आहे. या पदांचे ऑफलाईन अर्ज दि.07 जुलै 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी या कार्यालयात स्विकारली जातील. त्यांनतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तेंव्हा इच्छुक पात्रता महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) आर.व्ही.कड यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे