दिवाळीच्या सणानिमित्त दिव्यांग निवासी शाळेत साजरा केला फिनिक्स ग्रुप ने वर्धापन दिन..
Post-गणेश खबोले

लोहारा दि.२६(प्रतिनिधी)
लोहारा येथील फिनिक्स ग्रुप आपल्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असते, सालाबादप्रमाणे यंदाही फिनिक्स ग्रुप नी सास्तुर येथील दीव्यांग शाळेतील मुलांसाठी LED स्क्रीन उपलब्ध करून एक आदर्श निर्माण केला आहे, उपस्थित श्री विठ्ठल शेळगे सरांनी आपल्या प्रस्थाविकेत सांगितले की हा मोठा LED स्क्रीन मुलांसाठी ज्ञान ग्रहण करण्याच्या कक्षा नक्कीच वाढवेल,त्याबद्दल त्यांनी सर्व ग्रुप सदस्यांचे विशेष आभार मानले.उपस्थित सर्वांनी मुलांसोबत खाऊ वाटप करून दिवाळी साजरी करताना एक वेगळाच समाधानाची अनुभूती मिळाल्याची कबुली दिली. फिनिक्स ग्रुप सदस्य वीर फावडे,कृष्णा घोडके,अनिकेत स्वामी,जावेद मोमीन,राहुल बेलकुनिकर,रामेश्वर स्वामी,तानाजी कुंभार तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. फिनिक्स ग्रुप २००६ दहावी बॅच मधील सर्व मुली मुलांचे विशेष सहकार्य लाभले.