जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या समाजातील व्यक्तींना बसवरत्न पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित

जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या समाजातील व्यक्तींना बसवरत्न पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित
उमरगा /न्यूज सिक्सर
जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असलेल्या समाजातील व्यक्तीना बसवरत्न पुरस्कार देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्ताने शनिवारी (१५) दुपारी पाच वाजता उमरगा येथील महात्मा बसवेश्वर मंदिरात हा पुरस्कार वितरण सोहळा माजीमंत्री बसवराज पाटील अध्यक्षस्थानी असणार आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, कासार शिर्सी येथील श्री करीबसवेश्वर मठ संस्था श्री श्री श्री १०८ गुरू मुरुगेंद्र महा स्वामीजी यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष बापूराव पाटील उपस्थित असणार आहेत. यंदाच्या वर्षापासून जगदज्योती बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्ताने पुरस्कार देण्यात येत आहे. बसवरत्न पुरस्कार कलबुर्गी जिल्हा परिषदेचे आयएएस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ गिरीष बदोले, धाराशिव जिप उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत महादेव भुजबळ, अंबाजोगाई न्यायाधीश शिवदत्त मल्लिकार्जुन पाटील, मुंबई क्राईम बॅंच पोलीस निरीक्षक राहुल पाटील,सोलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवनी व्हट्टे, छत्रपती संभाजी नगर पोलीस निरीक्षक अश्विनी कुंभार, उपमहाराष्ट्र केसरी पै सागर हरीषचंद्र बिराजदार, शिवसेना जिल्हाध्यक्ष मोहन पणुरे, जिल्हाध्यक्ष बसवराज वरनाळे, जळगाव महावितरण विभागीय अभियंता विवेक स्वामी, आलमला श्री विश्वेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बसवराज धाराशिवे, गट शिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार, उद्योजक वीरभद्र स्वामी, शासकीय गुत्तेदार मेघराज बरबडे, ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ सचिन विश्वेकर, जनरल सर्जन डॉ अभिजित चिंचोळी, सीईटी राज्यगुणवत्ता धारक निखिल कोकले, ॲथलिट खेळाडू श्रेया व्हंडरे यांचा विविध प्रकारच्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्यास समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे सन्नी पाटील, प्रविण स्वामी, शिवकांत पतगे, सोमनाथ माळगे, जगदीश वरकले, करण पाटील, बालाजी पतगे, विपुल माळी, संदिप लिंबाळे, पंकज पतगे,प्रविण पाटील,बालाजी कुडूंबले,ईश्वर तुकशेटी, दिनेश बिराजदार यांच्यासह लिंगायत समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.