
लोहारा / प्रतिनिधी
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत दि.१० फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.इयत्ता पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.
आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते.शाळेच्या प्रांगणात १२० स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर पाटील,उपनगराध्यक्ष आयुब शेख,अभिमान खराडे,बाळासाहेब पाटील,श्रीकांत भरारे,दिपक रोडगे,शैलेश कांबळे गोपाळ संदिकर,रतन पोतदार,नागेश बिराजदार,प्रशांत थोरात,पत्रकार गिरीश भगत,अब्बास शेख,सुमित झिंगाडे,गणेश खबोले यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.पालक व नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे,केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, सुरेश अंबुरे ,मच्छिंद्र भुजबळ,दत्तात्रय फावडे ,राजकुमार दीक्षित,बालाजी यादव ,गुरुनाथ पांचाळ ,प्रवीण शिंदे ,सुरेश साळुंखे,जहरुद्दीन शेख ,अमोल जट्टे,संतोष माळवदकर,महानंदा चव्हाण,वर्षा चौधरी,सचिन शिंदे,मनीषा भोजने,ज्योती पाटील ,प्रमोद सरवदे ,नेहा भंडारे,सोनम कांबळे,दयानंद शिरसागर व अतुल भड आदी शिक्षक कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.