बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मिडीया समन्वयक पदी प्रशांत नवगिरे यांची नियुक्ती

बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मिडीया समन्वयक पदी प्रशांत नवगिरे यांची नियुक्ती
तुळजापूर /न्यूज सिक्सर
भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के . चंद्रशेखर राव यांच्या सुचनेनुसार पक्षाच्या सोशल मिडीयाचे राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख यांनी नुकतीच बीआरएस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मिडीया समन्वयक पदी प्रशांत नवगिरे यांची नियुक्ती केली आहे .
गेल्या कांही दिवसांपासून बीआरएस पक्षाने महाराष्ट्र राज्यात जोरदार मुसंडी मारली असून या पक्षामध्ये संबंध महाराष्ट्रातुन विविध राजकिय पक्षांतील माजी आमदार खासदार , नेतेमंडळी ,विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजातील प्रतिष्ठीत व मान्यवर मोठ्या संख्येने प्रवेश करित आहेत . यामुळे महाराष्ट्र राज्यात बीआरएस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढत आहे .
प्रशांत नवगिरे यांनी परवाच के . चंद्रशेखर राव यांच्या हस्ते बीआरएस पक्षांमध्ये प्रवेश केला होता . महाराष्ट्र राज्यातील सोशल मिडीया, प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक्स मिडियाद्वारे पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याची अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी प्रशांत नवगिरे यांचेकडे देण्यात आली आहे .