
लोहारा-प्रतिनिधी
भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक,प्रखर राष्ट्रभक्त,देशाच्या स्वातंत्र्यासाठी,राष्ट्र उन्नतीसाठी महत्त्वाचे योगदान देणारे,अस्पृश्यता निर्मूलन,सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारे,भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे सेनानी आणि प्रखर राष्ट्रवादी नेते स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त लोहारा येथे अभिवादन करण्यात आले.
न्यु व्हिजन इंग्लिश स्कुल लोहारा येथे स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार मेडिकल असोसिएशन लोहारा तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.यावेळी जनकल्याण समितीचे शंकर जाधव, जब्बार मुल्ला,गणेश खबोले,प्राचार्य शहाजी जाधव,प्रा.यशवंत चंदनशिवे उपस्थित होते.