युवासेनेच्या संपर्क अभियानस तुळजापूर तालुकावाशीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – प्रतिक रोचकरी
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी,तुळजापूर

युवासेनेच्या संपर्क अभियानस तुळजापूर तालुकावाशीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – प्रतिक रोचकरी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभेवर भगवा फडकवुन हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्नपूर्ण करणार असल्याची माहिती ठाकरे युवासेनेचे राज्य विस्तारक प्रतिक रोचकरी यांनी पत्रकार परिषदेत आयोजित केलेल्या प्रसंगी बोलत होते
दि.६ ऑगस्ट रोजी मंगळवारी दुपारी युवासेनेचे राज्य विस्तारक प्रतिक रोचकरी यांनी आगामी विधानसभा संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी मागील पाच वर्षात तुळजापूर तालुक्याचा कसलाही विकास झाला नसून जैशी थी वैशी परिस्थिती कायम आहे असे सांगून प्रशाद अंतर्गत तुळजापूर शहराचा विकास केला जाईल असे विद्यमान आमदार सांगतात. परंतु या संदर्भात राज्य सरकार अथवा केंद्र सरकार यांचा कुठलाही निधी उपलब्ध झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यमान आमदाराने तालुक्यात कुठल्याही विकास योजना आणल्या नाहीत अथवा शैक्षणिक योजना राबवल्या नाहीत. तुळजापूर हे एज्युकेशन हब बनवु असे त्यांनी जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात मंदिर चालवीत असलेले अभियांत्रिकी महाविद्यालय बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विश्वस्त आमदार अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करून कौशल्य विकास विद्यापीठ घालण्याचा घाट घालत आहेत .परंतु कौशल्य शिक्षण विकास ही योजना अद्यापही आपल्या देशात रुजलेली नाही त्याचे कारण त्याची असलेली भरगच्च फी व त्यापासून कुठलाही न मिळणारा रोजगार हे कारण आहे आणि अशा शैक्षणिक उपक्रम राबवून मंदिर संस्थांनला दिवाळखोरीत आणणार आहेत का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी युवासेनेचा याला विरोध असून, आहे ते कॉलेज चांगल्याप्रकारे चालवा असा सल्लाही त्यांनी दिला. सद्यस्थितीत प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विधानसभेसाठी प्रयत्न करीत आहे. महाविकास आघाडीकडे बाळासाहेब ठाकरेच्या स्वप्नपूर्तीसाठी तुळजापूर विधानसभा ठाकरे शिवसेनेला द्यावा अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामार्फत शिवसेनाप्रमुखांकडे करण्यात आली आहे, त्यासाठी आपण संपूर्ण तालुक्यात संपर्क अभियान सुरू केला असून आत्तापर्यंत २६ गावात भेटीगाठी दिल्या आहेत, यामध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. यामुळेच आपण पक्षाच्या आदेशानंतर विधानसभा लढविणार आहोत. अंतिमतः पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल त्याचे पालन केली जाईल असेही रोचकरी यांनी स्पष्ट केले.यावेळी युवासेना शहर कार्याध्यक्ष प्रतीक इंगळे उपस्थित होते.