स्पर्धेत टिकायचे असेल तर स्पर्धेत उतरणे गरजेचे- अमोल मोरे शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ प्रथम

स्पर्धेत टिकायचे असेल तर स्पर्धेत उतरणे गरजेचे- अमोल मोरे
शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ प्रथम
उमरगा/न्यूज सिक्सर
भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक चिटणीस शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या स्मरणार्थ गेल्या ३७ वर्षांपासून आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात घेतली जाते. यावर्षी (दि. १७) आयोजित आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने सांघिक प्रथम पारितोषक पटकाविले.
शिक्षणमहर्षी तात्याराव मोरे वादविवाद स्पर्धेचे सकाळी अकरा वाजता भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात एक पाऊल पुढे असले पाहिजे. अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला तर आत्मविश्वासाने जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित होऊ शकतो. असे मत व्यक्त करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव श्री पद्माकरराव हराळकर, संचालक डॉ. सुभाष वाघमोडे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव होते. तसेच उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे (विज्ञान), डॉ. संजय अस्वले (वाणिज्य), डॉ. धनाजी थोरे(कला), प्रा. जी. एस. मोरे (कनिष्ठ), प्रा. शैलेश महामुनी (पर्यवेक्षक), प्रभारी प्राध्यापक डॉ. के. बी. लेंगरे, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विनोद देवरकर आदींची उपस्थिती होती.
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व व नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतूने १. लोकप्रतिनिधींचे पक्षांतर लोकशाहीस घातक आहे/ नाही. २. खाजगीकरणामुळेच देशाचा सर्वांगीण विकास होईल/ होणार नाही. ३. नवीन शैक्षणिक धोरण-२०२२ बेरोजगारी दूर करण्यास सक्षम आहे/ नाही या ज्वलंत विषयांवर ही स्पर्धा घेण्यात आली.
या आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत उस्मानाबाद, लातूर, बीड व सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील १४ संघ सहभागी झाले होते.
वाद-विवाद स्पर्धेत लातूरच्या राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाच्या आदित्य दराडे, अक्षित हेरकर यांच्या संघाने प्रथम संघिक रुपये १०००१/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर राजर्षी शाहू वरिष्ठ महाविद्यालयाच्या कु. प्रतीक्षा मोरे, प्रमोद घोडके यांच्या संघाने सांघिक द्वितीय पारितोषिक रुपये ७००१/- व प्रमाणपत्र पटकावले. बीडच्या बलभीम महाविद्यालयाच्या रोहन चव्हाण यास वैयक्तिक उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये ३००१/- व प्रमाणपत्र देण्यात आले. या सर्वांचा भारत शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. सुभाष वाघमोडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. आर. एन. निगडे, प्रा. एल. व्ही. बिराजदार, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. डी. बी. ढोबळे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या आयोजनासाठी संयोजन समितीचे सदस्य डॉ. सन्मुख मुच्छटे, डॉ. सी. डी. करे, प्रा. व्ही. टी. जगताप, प्रा. एम. डी. साळुंके, प्रा. पी. एम. जवळगेकर, प्रा. बी. व्ही. मोरे, प्रा. एस. बी. कल्हाळीकर, डॉ. व्ही. एम. गायकवाड, डॉ. एस पी पसरकल्ले, डॉ. एस. टी. तोडकर, डॉ. ए. एस. पदमपल्ले आदींनी परिश्रम घेतले.
प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पी. डी. पाटील व डॉ पद्माकर पिटले यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. व्ही. डी. देवरकर यांनी आभार मानले.