आ.ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्यामुळे उमरगा शहरात सहा सार्वजनिक प्रसाधनगृहे (शौचालये) बांधकामासाठी 2.50 कोटी रु.निधी मंजूर
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
उमरगा शहरात विविध ठिकाणी शौचालये नसल्याने किंवा नादुरुस्त असल्याने शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक महिलांना विशेषतः उमरगा शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. ही गरज ओळखुन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी नगरविकास विभागाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसर, शासकीय झोपडपट्टी, इंदिरा चौक, शिंदे गल्ली, गौतम नगर व आरोग्य नगरीचे कॉर्नर या सहा ठिकाणी नवीन शौचालय बांधणे व उर्वरित नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे यासाठी एकूण 2.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. याअंतर्गत भारतीय व पाश्चात्य पद्धतीचे सीट व मुतारी उपलब्ध होणार असुन प्रत्येक शौचालयाशेजारी स्वतंत्र विंधन विहीर व सोलार पॅनलचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. नव्याने होणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचा उपयोग त्या त्या भागातील सुमारे 750 कुटुंब व शहर व शहरात येणाऱ्या असंख्य नागरिकांना करता येणार आहे. सदर कामासाठी निधी मंजुर केल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित (दादा) पवार, यांचे व सदरकामी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांचे आभार मानले आहेत.