उपसंपादक राहुल कांबळे
सुसंस्कृत, परिपक्वता पत्रकारिता करणारे तथा धार्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे चारित्र्यसंपन्न, निःस्वार्थ कार्याने प्रभावी, अचूक निर्णय क्षमता, सहनशीलता, परस्थिती बघून वागण्याचे भान ठेवणारे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागणारे, प्रचंड आत्मविश्वास बाळगणारे दूरदृष्टी, धाडशी व उत्साही माझे आदर्श मार्गदर्शक दिनेश सलगरे यांचा आज वाढदिवस या अष्टपैलू जिवलग मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पत्रकार दिनेश सलगरे यांनी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील नवरत्न यांचा गौरव करून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सकारात्मक व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तब्बल ३५ रामभक्तांचा व उद्योजकांचा सन्मान करीत पाठीवर शाबासकी बहाल करून यथोचित पुरस्कार प्रदान केला आहे यामुळे समाजात अनेक सकारात्मक बदल घडण्यास निश्चितच सुरवात
झाली आहे शिक्षण, आरोग्य, धार्मिक, पत्रकारिता, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपली ओळख अधोरेखित केली आहे कोणताही दिखाऊ पणा न करता, कुणाचीही फसवणूक न करता प्रत्येकाच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे पत्रकारितेची धुरा त्यांनी तारुण्यातच हाती घेऊन पत्रकारांच्या रथाला चार चक्र लावून सामर्थ्य, महत्वकांक्षा, निर्भयता, सातत्य ठेवत समाज प्रबोधन करण्याचा अहोरात्र प्रयत्न करतात विशेष म्हणजे इटकळ व परिसरातील खानापुर, सराटी, येवती, हिप्परगा ताड, उमरगा चि., केरूर, केशेगावं, धनगरवाडी, अणदूर आदि गावात रामकथा सुरू करून बंद पडत असलेल्या धार्मिक कार्यास नव संजीवनी दिली निरपेक्ष अशा सेवेतून ते सतत राम कथा निरूपण प्रवचन करतात सध्या त्यांनी सुरू केलेल्या या धार्मिक कार्यास गावोगावी प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्याने अनेक तरुण धार्मिक कार्याकडे वळत व्यसन मुक्त होत असल्याचे दिसून येत आहेत अशा या सामाजिक व धार्मिक कार्यात झोकून देत सामाजिक धार्मिक प्रबोधन करणारे इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा आमचे जिवलग मित्र रामभक्त दिनेश सलगरे यांना या ५० व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
चांदसाहेब (दादा) शेख पत्रकार तथा शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष मंगरूळ ता. तुळजापूर