कुस्ती मध्ये प्रदीप गोरे लोहारा केसरी,मॅरेथॉन मध्ये निवृत्ती गुडेवाड विजेता
पत्रकार-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा शहराचे ग्रामदैवत शंभु महादेव महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त मागील दोनतीन दिवसापासून शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम,स्पर्धा होत आहेत.लोहारा हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी (दि.९) कुस्ती स्पर्धा पार पडल्या.अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम कुस्तीत रामलिंग मुदगड येथील प्रदीप गोरे याने विजय मिळवून लोहारा केसरी किताब पटकावला.वडगाव वाडी येथील जीवन भुजबळ उपविजेता ठरला.यावेळी कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सर्वप्रथम सायंकाळी पाच वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच शंकर जट्टे,माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील,नगरसेवक विजयकुमार ढगे,दिपक मुळे,माजी नगरसेवक श्रीनिवास माळी,गोपाळ सुतार,विठ्ठल वचने यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले.
कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्हा व इतर जिल्ह्यातील नामवंत मल्ल सहभागी झाले होते.यावेळी १०० रुपयांपासून ४ हजार रुपयां पर्यंतच्या कुस्त्या झाल्या.अंतिम कुस्तीसाठी सहा जणांची नोंदणी झाली होती. त्यामुळे लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून लॉट्स पध्दतीने कुस्त्या लावण्यात आल्या. वडगाववाडी येथील जीवन भुजबळ व रामलिंग मुदगड येथील प्रदीप गोरे यांच्यात अंतिम कुस्ती झाली.ही कुस्ती जवळपास अर्धा तास चालली. अखेर ही कुस्ती प्रदिप गोरे याने जिंकली.मान्यवरांच्या हस्ते प्रदिप गोरे याला जट्टे कुटुंबियांच्या वतीने ३५ तोळे महादेवाची चांदीची पिंड देऊन गौरविण्यात आले.उपविजेता जीवन भुजबळ याचाही सत्कार करून त्याला ५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. यावेळी लोहारा येथील सद्गुरू कुस्ती संकुलाच्या मल्लांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दि.१० रोजी सकाळी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.३ किलो मीटर च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इतर जिल्ह्यातील स्पर्धक आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भानुदास चव्हाण महाविद्यालय पर्यंत च्या अंतरात ही स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेचे उदघाटन पोलिस निरीक्षक अजित चिंतले, राजेंद्र फावडे, डॉ. बाळासाहेब भुजबळ,बालाजी माशाळकर,डॉ. इरफान शेख,हरी लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेत लहान गट व मोठा गट सहभागी झाले होते.स्पर्धेतील विजेता निवृत्ती गुडेवाड यांनी बुट न घालताच स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.सतर दुसरा क्रमांक व्रगसेन जाधव,तिसरा क्रमांक आदिनाथ बेशकराव, चौथा क्रमांक अमर जाधव ने पटकावला मोठ्या गटात लहान असलेले अर्जुन गणेश मोरे,साई निलेश महामुनी यांनी स्पर्धा पुर्ण केली.तर लहान गटात,प्रथम हर्षवर्धन हरी लोखंडे,द्वितीय मंथन सुनील देशमाने,तृतीय यश अनिल देशमाने यांनी पटकावला.यावेळी यात्रा कमिटीचे गोपाळ सुतार,विठ्ठल वचने,सुनील देशमाने,भिमाशंकर डोकडे, सतीश ढगे,राजपाल वाघमारे, अमित बोराळे,तंमा स्वामी,श्रीनिवास माळी, दिनेश माळी महेश कुंभार,खंडू शिंदे,बळी रनशूर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.