पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने येरमाळा यात्रा परिसरात सुरट व टायगर जुगार खोळणाऱ्या विरोधी कारवाई

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने येरमाळा यात्रा परिसरात सुरट व टायगर जुगार खोळणाऱ्या विरोधी कारवाई
येरमाळा/न्यूज सिक्सर
मा.पोलीस अधीक्षक सो यांचे आदेशान्वये येरमाळा यात्रा येथे अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 08.04.2023 रोजी येरमाळा यात्रा येथे पथक तयार करुन त्यांना गोपनीय माहिती काढुन येरमाळा यात्रा येथे सुरट व टायगर नावाचा जुगार खेळणारे विरुध्द कारवाई करणेसाठी सांगण्यात आले होते. सदरचे पथक यांनी गोपनिय माहीती मिळाली की, येरमाळा यात्रा येथे एकुण 21 जुगार खेळणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांचेकडुन एकुण 16310/- रु रोख रक्कम व 06 मोबाईल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन सपोनि कासार, सायबर सेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकाने केली आहे.