
संपादक शाहूराज साळुंखे यांचे निधन
तुळजापूर : पतिनिधी
तुळजापूर येथील शाहूराज अंबादास साळुंखे यांचे अल्प आजाराने पहाटे 5.30 वाजता सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता तुळजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
तुळजापुरातील तुळजाभवानी विद्यालय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि आम संघर्ष टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक होते. हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते मागील महिनाभरापासून ते सोलापूर येथील रुग्णालयात उपचार घेत होते पहाटे साडेपाच वाजता त्यांचे निधन झाले आहे त्यांच्या पश्चात दोन पत्नी चार मुले दोन मुली नातवंडे असा साळुंखे परिवार आहे.