दोन गटातील जबर मारहाण प्रकरणी ७ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

दोन गटातील जबर मारहाण प्रकरणी ७ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
तुळजापूर : प्रतिनिधी
नळदुर्ग येथे धारदार शस्त्राने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवी कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद असलेल्या ७ आरोपींना तुळजापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे २६ एप्रिल २०२३ रोजी गावातील तरुणांच्या दोन गटांमध्ये लोखंडी रॉड कुऱ्हाड कोयता आणि तलवारीच्या साह्याने तुंबळ हाणामारीची घटना घडली.
याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०७ सह अन्य कलम लावण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्याकडे ऍड दिगंबर भाकरे, उच्च न्यायालय मुंबई, अॅड. समाधान विठ्ठल गोरे, अँड. तोफिक फरीद फकीर यांनी आरोपींच्या अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. कलम ३०७ अन्वये जबरी दुखापत संबंधी उच्च न्यायालय सोबत सर्वोच्च न्यायालयातील न्याय निवाडा केलेला युक्त वाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी एकूण ७ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला या प्रकरणातील सर्व आरोपी काटगाव ता. तुळजापूर येथील रहिवासी आहेत.