
धाराशिव-प्रतिनिधी
मुंबई येथे दि.१३ मे रोजी ठाणे येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी धाराशिव लोकसभेच्या निवडणूकीचा पक्षाचे प्रवक्ते योगेशजी केदार,धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके व युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे यांच्याकडून आढावा घेतला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी धाराशीव जिल्ह्यातील राजकीय घडामोडी समजून घेतल्या.
अमरराजे कदम व ज्ञानेश्वर घोडके यांनी धाराशीव लोकसभेत केलेल्या कार्याचा अहवाल ही दिला.अमरराजे कदम यांनी श्री तुळजा भवानी मंदिर विकास आराखडासंदर्भात भरीव निधी उपलब्ध केला जावा तसेच तुळजापूर शहर पर्यटनाच्या दृष्टीने देखील विकसित व्हावा याबाबत चर्चा केली. योगेश केदार यांनी मराठवाडा दुष्काळ व उजनीचे २१ टिएमसी पाण्याबाबत चर्चा केली.