आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे युवा नेते विनोद (पिटूभैय्या) गंगणे मित्रपरिवाराचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे युवा नेते विनोद (पिटूभैय्या) गंगणे मित्रपरिवाराचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.
मी दादासोबतच आहे – विनोद (पिटूभैय्या) गंगणे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
पिटूभैय्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेहमीच तुळजापूरच्या विकासाला, प्रगतीला साथ दिली आहे. ही साथ यापुढेही कायम असेल व पुन्हा एकदा महायुतीचा प्रचंड विजय होईल, हा विश्वास यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला वैश्वीक पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी आपण स्वप्न पाहिले. त्याचा पाठपुरावा केला. केंद्रातील आपले सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने त्याला पाठबळ दिले आणि आता २ हजार कोटी रूपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम झाला आहे.
तुळजापूर शहर एक संपन्न आणि समृध्द शहर म्हणून पुढील काळात देशातील नकाशावर आल्याखेरीज राहणार नाही. त्यादिशेने सुरू असलेल्या आपल्या प्रयत्नांना आता आकार आला आहे.
तुळजापूरकरांचा आर्थिक स्तर अधिक सुधारावा यासाठी विकासाचे सकारात्मक राजकारण हीच आपली कार्यपद्धती आहे. म्हणून मतदासंघातील सर्वांचे सहकार्य आणि विश्वास आपल्या पाठीशी ठामपणे आहे. तुळजाभवानी मातेचा पुन्हा आशीर्वाद लाभेल असा विश्वास आहे.