
लोहारा-प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. 21 जून 2024 रोजी लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला.
शाळेचे क्रीडाशिक्षक श्री पांढरे एन.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगसणांचा सराव केला. यावेळी सर्वप्रथम सूक्ष्म व्यायाम,त्यानंतर उभे राहून करायचे योगासन,पाठीवर झोपून केले जाणारे योगासन, पोटावर झोपून केले जाणारे योगासन यांचा अभ्यास करण्यात आला.तसेच प्राणायाम याचाही अभ्यास करण्यात आला.श्री पांढरे सर यांनी योगासनाचे व प्राणायामाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी प्राचार्य श्रीमती यु.व्ही.पाटील मॅडम यांच्यासह शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यांत सहभाग घेतला.