न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

गद्दारोके साथ यारी नही.. और यारो के साथ गद्दारी नहीं….. ॲड.कुलदिप उर्फ धीरज पाटल यांच्या प्रचार शुभारंभ दरम्यान विरोधकावर टोला मारला – माजी राज्य मंत्री देशमुख

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

गद्दारोके साथ यारी नही.. और यारो के साथ गद्दारी नहीं…..

ॲड.कुलदिप उर्फ धीरज पाटल यांच्या प्रचार शुभारंभ दरम्यान विरोधकावर टोला मारला – माजी राज्य मंत्री देशमुख

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार सभेचा नारळ दि.७ नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथील केवडकर मंगल कार्यालयात माजी मंत्री,जेष्ठ नेते आमदार अमीत देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, संजय पाटील दुधगावकर, विश्वासआप्पा शिंदे,संजयमामा निंबाळकर, सक्षणाताई सलगर, रामचंद्रदादा आलुरे, धैर्यशील पाटील, जगन्नाथ गवळी आदी प्रमुख मान्यवरासह,पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांसह भव्य दिव्य प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

 

सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून उपस्थित प्रमुख पाहुण्याचा सत्कार करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. आपल्या प्रास्ताविक पर भाषणात महाविकास आघाडीचे उमेदवार एडवोकेट कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब पाटील म्हणाले की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली आहे. ऐक निष्ठावान कार्यकत्याला संधी मिळाली आहे. मी माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, जिवनरावजी गोरे,अशोकभाऊ जगदाळे या सर्वांचे मनापासून आभार मानतो.माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी फार संघर्ष करून,कष्ट घेऊन तालुक्याचा विकास केला आहे. तसेच नरेंद्र बोरगावकरांचाही तालक्याच्या विकासामध्ये मोलाचे योगदान आहे. सध्याचे विद्यमान आमदार श्रेय घेण्यासाठी नारळ फोड्या कार्यक्रम चालू आहे. प्रत्येक समाजाची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे. अचारसंहिता चालू असतानाही उद्घाटनांचे कार्यक्रम घेतात. या महायुती सरकारने सोयाबीनचे भाव पाडलेत,किराणासामानाचे भाव वाढवलेत,जीएसटी. सारखा अन्यायकारक कर लावला आहे.

प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ नेते माजी मंत्री आमदार अमीत देशमुख म्हणाले की तुळजापूर ला येत असताना मला नेहमी आमच्या कुळाकडे येतोय याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. धाराशिवच्या पाटलांचे व लातुरच्या देशमुखाचा संघर्ष, वाद,चढाओढ सर्व महाराष्ट्रने पाहीला आहे. मराठवाड्याच हक्काचे २१टीएमसी. पाणी लातूर जिल्ह्याला मिळणार नाही.याची जाणीव असुनही स्वर्गीय विलासराव देशमुखानी कुठलाही भेदभाव न करता मंजुरी दिली. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा ही २१ टिएमसी.पाणी मिळवण्यासाठी सिंहाचा वाटा आहे. मधुकरराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडीत त्याचां योग्य तो सन्मान केला जाईल.राणाजगजितसिंह पाटलानां व त्याच्यां वडीलांना शरदचंद्र पवारांनी सगळे कांही देऊनही तुम्ही त्यानां सोडून दिल मग तुम्ही कोणाचे आहात.महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या धाराशिव जिल्ह्यात उद्योग उभारू,सिंचन, दळणवळण सुधारू,सुशिक्षित बेरोजगारानां काम देऊन त्यांची आर्थिक उन्नती करणार. या महायुती सरकारने तुमच्या मताचा धंधा केला आहे. कालच मुंबई मधे राहुल गांधीनी पंचसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्या मध्ये महायुती सरकारपेक्षाही जास्त सेवा सुविधा देण्याचे वचन दिले आहे. राज्य सरकारनेही ऐक कायदा करून शेतकऱ्यांच्यां मालाला एमएसपी.सारखाच योग्य सरकारी धान्यभाव जाहीर करायचा कायदा करावा लागेल.हे बोलत असतानां महाविकास आघाडी चे उमेदवार एडवोकेट कुलदिप उर्फ धिरज पाटलानां प्रचंड मतानी विजयी करा असे आवाहन केले.सर्वाचे लाडके खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या धडाकेबाज भाषणात म्हणाले की सहामहीन्यापुर्वीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संविधानाची शक्ती आपणाला दिसली आहे. लातुर जिल्ह्याची प्रगती पहाता नवीन लोकांना लातूर जिल्ह्यातीलच धाराशिव तालुका आहे असे वाटते. ओमराजे निंबाळकर खासदार असताना तुळजापूर रेल्वेच्या कामाचे उद्घाटन झाले. पण त्याचे श्रेय विरोधक घेत आहे. तुमच्या जन्म गावात ओमराजेला ४२८ मताची आघाडी मीळाली आहे. म्हणून आधी आपल गाव बघा मग जिल्ह्याच,तालुक्याच नेतृत्व करा तेर येथे गोरोबाकाकाच्या मंदिराचे बांधकाम करतेवेळी साडेपाच ऐक्कर असणाऱ्या हनुमंत श्रीपती ऐडके या गरीब शेतकऱ्यांची जमीन घेण्यासाठी आमदारकीने आदेश काढता व तेथेच तुमची दीडशे ऐक्कर जमीन असुनही हातही लावत नाही बळजबरीने सामान्य शेतकऱ्यांच भुसंपादन करता.फक्त सोशलमिडीयावर ऐक हजार कोटी खर्च केल्यावर श्री तुळजाभवानी मंदिर कस दिसेल हे दाखवायचे कामं करता.श्रेय घेण्यासाठी उद्घाटनांचे नाटकं करता म्हणून विरोधकाच्या भूलथापांना बळी न पडता मी स्वतः ओमराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहे असे समजू अँड. कुलदिप उर्फ धिरज पाटलानां प्रचंड मतानी निवडून आणावेच लागेल असे आवाहन उपस्थित जनतेला केले.

या प्रचारकार्याच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय पाटील दुधगावकर, सक्षणा सलगर,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कमलाकर चव्हाण,प्रतीक रोचकरी,अनील लबडे,रूबाब पठाण, मेहेबुब पटेल,जगन्नाथ गवळी,सुधीर मगर आदी पदाधिका-यानी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अग्नीवेश शिंदे व जुबेर शेख यांनी केले.तर आभार युवा नेते अमोलभैय्या कुतवळ यांनी मानले.या वेळी शामलताई वडणे,स्मिता शहापुरकर, शैलाताई उंबरे,ज्योतीताई सपाटे,सुधीर कदम,प्रकाश चव्हाण, राजाभाऊ शेरखाने, मधुकर शेळके,विनोद वीर,शहाबाझ काझी आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे