पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले जिल्ह्यात हजारोंच्या संख्यने वृक्षारोपन

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले जिल्ह्यात हजारोंच्या संख्यने वृक्षारोपन
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून वृक्षांचा होत असलेला मृत्यु हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा हळूवारपणे होत असलेला अंत आहे. वृक्ष केवळ आपलेच जिवन प्रभावीत करतात असे नव्हे तर ते आपले अस्तित्व सुरक्षीत करण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. हे ध्यानात घेउन मानवाने वृक्षाची लागवड करुन त्याचे संवर्धन करने अत्यंत गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात काटेरी बाभुळ ही झाडे पाहवयास येत असून त्यापासून पर्यावरणास फायदा नसून उलट कोणतेही पशु- पक्षी- जनावरे त्याच्यावर तसेच खाली निवाराऱ्यास बसत नाहीत. तसेच काटेरी बाभुळ ज्या ठिकाणी येतात तेथील परिसरात अन्य वृक्ष येत नसून तो परिसर पडीक राहतो. त्यामुळे अशा काटेरी बाभुळी काढून त्या जागी पर्यावरण पुरक अशा वृक्षांची लागवड करावी यातूनच उस्मानाबाद जिल्ह्यात वृक्ष कमी प्रमाणात असल्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी ध्यानात घेउन त्यांनी जिल्ह्यात रुजू झाल्यापासून वृक्षलागवडीचा संकल्प केला. त्यातुन पोलीस अधिकारी- अंमलदार, विद्यार्थी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांच्या मदतीने अद्याप पर्यंत पोलीस मुख्यालय येथे15,000, उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे 5,000, हाडोंग्री येथील भगवंत विद्यालय, पर्यावरण व वन्यजिव संवर्धन केंद्र आणि पुरातन महादेव मंदीर शिवकडा परिसरात 15,000, येरमाळा येथील येडेश्वरी मंदीर परिसर 5,000, जिल्ह्यातील महामार्गालगत 6,000 तसेच तिर्थ खुर्द (बु) येथे 5,000, जकेकुरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असे एकुण 51,000 वृक्षाची लागवड केली असुन त्यामध्ये करवंद, लिंबू, जासवंद, अपटा, खैर, बेल, पारीजात, सिताफळ, पेरु, पिंपळ, सिसम, अंबा, साग, बेहरा, वड, उंबर, रातराणी, निरगुडी, मोहगणी, व इतर 56 प्रकारांच्या वृक्षाचा समावेश असुन येणाऱ्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात 10 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी केला आहे.