जोरदार शक्तिप्रदर्शन; महायुतीचे उमेदवार आ.ज्ञानराज चौगुले यांचा हजारोंच्या उपस्थितीत अर्ज दाखल
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
उमरगा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करीत लाडकी बहिण यांच्या हजारोंच्या उपस्थितीत
उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं रयत क्रांती सह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे सर्वच प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विधानसभे साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आ.ज्ञानराज चौगुले यांनी शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी सभापती जितेंद्र शिंदे, भाजपचे माजी सभापती अभय चालुक्य, युवा सेना मराठवाडा निरिक्षक किरण गायकवाड, भाजपा उमरगा लोहारा निवडणूक प्रमुख राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, युवती सेना मराठवाडा निरिक्षक आकांक्षा चौगुले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ रयत क्रांती पक्षचे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील महादेव मंदिर ते इंदिरा चौक, श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाळासाहेब ठाकरे चौक, अण्णाभाऊ साठे चौक,तहसील कार्यालय फेरी काढण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर फेरीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. छत्रपती शिवाजी चौक उमरगा येथे सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी खा.प्रा.रवींद्र गायकवाड, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र शिंदे, मराठवाडा युवा निरीक्षक किरण गायकवाड, मराठवाडा युवती निरीक्षक कु आकांक्षाताई चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अभयराजे चालुक्य, हरीश डावरे, माजी सभापती मदन पाटील, लोहारा नगरपंचायत नगराध्यक्ष वैशालीताई खराडे, आरपीआयचे नेते सुभाष सोनकांबळे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.चंद्रकांत महाजन, शिवसेना जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबा जाफरी, भाजप व्यापारी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार, प्रा.शौकत पटेल, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे,
लोहारा शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, राजेंद्र माळी, तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शंतनु सगर, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, लहुजी शक्ती सेना विजय तोरडकर, रयत क्रांती जिल्हाध्यक्ष सुरज अबाचने, माजी नगरसेवक सिद्रामप्पा चिंचोळे, सिद्धेश्वर माने, सागर पाटील, सुशील दळगडे, गुलाब डोंगरे, शेखर मुदकांना, निखिल घोडके, सरपंच अमर सूर्यवंशी, दिलीपसिंह गौतम, यांची उपस्थिती होती या वेळी सर्व प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय कोथळीकर यांनी केले तर आभार चंद्रशेखर सूर्यवंशी यानी मानले.