
धाराशिव (सतीश राठोड)
लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील खुदावाडीत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सप्निल लोखंडे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्याची बैठक घेवून गाव शांतता बैठक घेतली .एकंदरीत गावची माहीती व लोकांच्या समस्या जाणून घेत सर्वजाती धर्मातील नागरिकांनी गुण्यागोविंदाने राहवं कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी , गावात दवंडी देण्यात यावी , चोरी घोरपडी सारख्या घटना घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना बोलावून शांतता कमिटी बैठक घेऊन माहीती दिली .तसेच कार्यकर्ते समवेत गावात गावफेरी करून ग्रामस्थांशी संवाद साधत जनजागृती केली .लोकसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असेही बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक लोखंडे म्हणाले याप्रसंगी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी धनंजय वाघमारे , तंटामुक्त अध्यक्ष वसंत कबाडे , पोलिस पाटील बसवेश्वर सांगवे , भिमाशंकर कबाडे , दत्तू घोडके , किरण घोडके , महेश जवळगे , बंडू मोळगड्डे , लहुजी शक्ती सेनेचे रामजी गायकवाड , संजू खंदारे , संभा घोडके , आपू टेलर , ग्रामपंचायत कर्मचारी बाळू गायकवाड सह नागरिक उपस्थित होते .