तालुक्यातील शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे. – तलाठी अशोक भातभागे

तालुक्यातील शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे. – तलाठी अशोक भातभागे
तुळजापूर /न्यूज सिक्सर
तालुक्यातील रब्बी हंगाम २०२३ ची ई-पीक पाहणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये काही महत्त्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाइल ॲप-व्हर्जन-२ विकसित करण्यात आलेले आहे. हे सुधारित ई-पीक पाहणी मोबाइल ॲप व्हर्जन-२ प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे.दरम्यान, सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीचे ॲप डाउनलोड करून मोबाइलद्वारे आपल्या पिकाची नोंद करावी. तहसिलदार यांच्या आदेशावरून ॲपमध्ये पिकाची नोंद करण्यासाठी फक्त दोन तीन दिवस आहेत असे आव्हाण तुळजापूर तलाठी अशोक भातभागे यांनी केले आह
चौकट …..
तुळजापूर व हंगरगा तुळ , सिंदफळ, अमृतवाडी, येथील शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, ई पौक पाहणी अँप व्हर्जन – २ मधून रब्बी हंगामाची पिकाची नोंद २ दिवसाच्या आत करून घ्यावी. आपण पिक पाहणी न केल्यास जमीन पडीक नोंद झाल्यास किंवा शासकीय लाभ न मिळाल्यास त्यास आपण स्वतः जबाबदार राहणार आहात तर सर्व शेतकरी वर्गांनी याची नोंद घ्यावी
तलाठी सज्जा तुळजापूर
अशोक भातभागे,
चौकट …..
उस्मानाबाद तालुक्यातील बावी, कावलदरा, खामसवाडी, धारूर येथील शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, ई पौक पाहणी अँप व्हर्जन – २ मधून रब्बी हंगामाची पिकाची नोंद २ दिवसाच्या आत करून घ्यावी. आपण पिक पाहणी न केल्यास जमीन पडीक नोंद झाल्यास किंवा शासकीय लाभ न मिळाल्यास त्यास आपण स्वतः जबाबदार राहणार आहात तर सर्व शेतकरी वर्गांनी याची नोंद घ्यावी
तलाठी सज्जा बावी ता.जि.उस्मानाबाद
अमोल निरफळ